बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैनवर बलात्काराचा गुन्हा दाखल

बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैनवर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 16, 2022 | 9:56 AM

मुंबई : बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैनवर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. या दाखल झालेल्या गुन्हामुळे बॉलीवूडमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. तर राहुल जैनवर मुंबईतील एका कॉस्च्युम डिजायनरने आरोप करताना केले आहेत. त्याप्रमाणे त्याच्यावर कलम 376, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. तर यासंदर्भात बोलताना राहुल जैनवर ती महिला खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. तसेच तिचा हा आरोप निराधार असल्याचा दावाराहुल जैनने करत आपल्यावरिल हे आरोप फेटाळले आहेत. मात्र याप्रकरणी या प्रकरणात पिडीत महिलेने सोमवारी 15 ऑगस्टला ओशिवरा पोलीस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. त्याप्रमाणे ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें