Nalasopara Shop Bike Fire | आग लागली दुकानाला पण आगीत जळाल्या 50 दुचाकी, प्रचंड नुकसान

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तात्काळ घटना स्थळावर दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण वित्तहानी मोठी झाली आहे.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 25, 2022 | 7:48 PM

नालासोपारा : नालासोपाऱ्यात  एका दुकानात शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली आहे. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की बाजूलाच पार्किंगमध्ये उभा असलेल्या 50 च्या वर मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. नालासोपारा पश्चिम बस आगारा जवळील गॅलकशी हॉटेल जवळ आज दुपारी सव्वा चारच्या सुमारास ची ही घटना आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तात्काळ घटना स्थळावर दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण वित्तहानी मोठी झाली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें