भडगावच्या ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात संतापाची लाट, सर्वपक्षीय संघटनांकडून बंदची हाक
VIDEO | भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, भडगावमध्ये कुणी दिली बंदची हाक?
जळगाव, ५ ऑगस्ट २०२३ | जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हाधराला आहे. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. इतकेच नाहीतर तिचा मृतदेह चाऱ्याच्या कुट्टीत लपवल्याचा प्रकार उघड झाला आहे. या संतापजनक घटनेविषयी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनांकडून भडगाव बंदची हाक देण्यात आली आहे. या पिडीत चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी भडगाव बंदची हाक देण्यात आली आहे. ही बंदची हाक दिल्यानंतर भडगाव बंदला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकऱणी फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.
Published on: Aug 05, 2023 04:07 PM
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
