उंदीर चावला अन् रूग्ण दगावला… ससूनमध्ये एकच गदारोळ, नातेवाईकांचा आरोप काय?

| Updated on: Apr 02, 2024 | 4:15 PM

उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. पुण्याच्या ससून रूग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून आता रूग्णाचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय. घडलेल्या या प्रकारामुळे ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. पुण्याच्या ससून रूग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून आता रूग्णाचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय. घडलेल्या या प्रकारामुळे ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वी देखील ड्रग्स प्रकरणामुळे ससून रूग्णालय चर्चेत आलं होतं. याच रुग्णालयात सागर रेणोसे नावाचा एक रूग्ण गेल्या दहा दिवसांपासून उपचार घेत होता. मात्र या ससूनमधील आयसीयू वॉर्डमध्ये त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असताना त्याला उंदीर चावला आणि त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. तर रूग्णालयातून देण्यात आलेल्या अहवालानुसार, रूग्णाला उंदीर चावल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या घडलेल्या प्रकारानंतर नातेवाईंनी रूग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. जोपर्यंत रूग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा या मृत रूग्णाच्या नातेवाईंकांनी घेतला आहे.

Published on: Apr 02, 2024 04:15 PM
Follow Us