वैद्यकीय प्रतिनिधीचा कारनामा? मित्रानेच केला भांडाफोड? शिवरायांवर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी एकस अटक
राज्यातील पुन्हा राजकीय तापमान तापण्याची शक्यता आहे. येथील सांताक्रूझ पूर्व भागात राहणाऱ्या वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्याचा कारणामा समोर आला असून त्याने शिवरांयांचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसवर ठेवल्याचे समोर आले आहे.
मुंबई, 9 ऑगस्ट 2023 । राज्यात एकिकडे संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून वातावरण अजूनही शांत झालेले नसतानाच आता दुसरे प्रकण समोर आले आहे. ज्यामुळे राज्यातील पुन्हा राजकीय तापमान तापण्याची शक्यता आहे. येथील सांताक्रूझ पूर्व भागात राहणाऱ्या वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्याचा कारणामा समोर आला असून त्याने शिवरायांवर आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसवर ठेवल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे त्याला आता वाकोला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, सांताक्रूझ पूर्व येथे राहणारा शाहबाज तस्लीम खान हा एका खासगी कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतो. तर त्याचा मित्र सचिन पाठक हा देखील त्याच्याबरोबर काम करतो. याचदरम्यान शाहबाज याच्या स्टेटसवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा मॉर्फ केलेला एक क्लिप समोर आली. त्यानंतर पाठक यांने याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

