उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी तरुणाचा बाईकवरून प्रवास

जामखेड मधल्या एका तरुणाने जामखेड ते मातोश्री पर्यंत चार दिवस मोटरसायकलचा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान या तरुणाने जामखेड मधील नागेश्वर मंदीर - येडेश्वरी - तुळजापुर- पंढरपुर - शिर्डी - जेजुरी - महालक्ष्मी -  हाजीयाली बाबा - मुंबादेवी या महाराष्ट्रतील धार्मिक स्थळांत जाऊन  धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळावे यासाठी साकडे घातले आहे.

सुनील जाधव

| Edited By: वनिता कांबळे

Aug 09, 2022 | 10:25 PM

मुंबई : एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना शिवसेनेचे धनुष्यबाण  कुणाचं यावरही वाद सुरू आहे. हा वाद  निवडणूक आयोगाच्या दारात सुरू असून शिंदे गटाच्या पक्षावरील दाव्यानंतर निवडणूक आयोगाने 8 ऑगस्टला दुपारी 3 वाजेपर्यंत दोन्ही बाजूंना आपापली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला होता. पण सुप्रीम कोर्टात घडामोडी चालू असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आयोगाकडे चार आठवड्यांच्या मुदत वाढीची मागणी केली आहे. या वर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे धनुष्यबाण याचा निकाल उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray‘) यांच्या बाजूने लागावा यासाठी जामखेड मधल्या एका तरुणाने जामखेड ते मातोश्री पर्यंत चार दिवस मोटरसायकलचा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान या तरुणाने जामखेड मधील नागेश्वर मंदीर – येडेश्वरी – तुळजापुर- पंढरपुर – शिर्डी – जेजुरी – महालक्ष्मी –  हाजीयाली बाबा – मुंबादेवी या महाराष्ट्रतील धार्मिक स्थळांत जाऊन  धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळावे यासाठी साकडे घातले आहे. भरत पवार असे या तरुणाचे नाव असून हा तरुण जामखेड मध्ये एका वीट भट्टी वरती तो  काम करतो.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें