AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AAP Protest GST : जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा! आपचे जीएसटीविरोधात अनोखे आंदोलन

AAP Protest GST : जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा! आपचे जीएसटीविरोधात अनोखे आंदोलन

| Updated on: Jul 13, 2022 | 5:57 PM
Share

Protest Against GST News : आपने पुण्यात जीएसटीविरोधात अनोखे आंदोलन केले. यावेळी जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा काढण्यात आली.

AAP Agitation Pune News : आपने जीएसटीविरोधात पुण्यात अनोखं आंदोलन केलं. या आंदोलनानं पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं. पुण्यात या आंदोलनाची खास चर्चा रंगली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा (Funerals of essentials) काढली. सरकारने खाद्यांन्न आणि जीवनावश्यक वस्तू जीएसटीच्या (GST)परीघात आणले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा बोजा पडणार आहे. अगोदरच जनता महागाईने (Inflation) त्रस्त आहे. त्यातच सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. त्याला विरोध म्हणून पुण्यातील आप कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आणि जीएसटीविरोधात हे अनोखं आंदोलन बुधवारी केलं. यावेळी अत्यंयात्रा काढण्यात तर आलीच. पण आंदोलनात यमाचे कपडे परिधान करुन काही कार्यकर्ते आले होते. त्यांनी ही पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं. जीएसटी लवकर रद्द नाही केला तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.

नागरी समस्यांबाबत ही ओरड

आंदोलनात केंद्र सरकारसोबतच नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारविरोधातही घोषणा देण्यात आल्या. पुणे शहरातील रस्ते पावसाळ्यात जलमय होतात. पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने अर्धवट कामे केल्याचा ठपका आंदोलनकर्त्यांनी केला.