TET Scam : मला बदनाम करण्याचा प्रकार, चौकशी करून कारवाई करावी, अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया

टीईटी घोटाळा प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. परीक्षा परिषदेकडून जे उमेदवार या गैर प्रकारात अडकले आहेत. त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत 7 हजार 874 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

शुभम कुलकर्णी

|

Aug 08, 2022 | 11:17 AM

औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रकरणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमची चूक असेल तर बिनधास्त कारवाई करा आणि बदनामी करणाऱ्यांना फासावर लटकवा, अशी प्रतिक्रिया आमदार अब्दुल सत्तारांनी दिली आहे.’ टीईटी घोटाळाचे धागेदोरे हे सिल्लोड, औरंगाबादपर्यंत असल्याची माहिती आहे. परीक्षा परिषदेकडून जे उमेदवार या गैर प्रकारात अडकले आहेत. त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत 7 हजार 874 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते. ते पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें