कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण? थेट व्हिडीओ आला समोर…

कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण? थेट व्हिडीओ आला समोर…

| Updated on: May 23, 2026 | 11:24 AM

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकारामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकारामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचा वाढता प्रभाव आणि काही राजकीय मतभेद यामागचे कारण असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे.

अभिजीत यांनी स्वतः त्यांच्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत या धमकीबाबत माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर विभागाची मदत घेतली जात आहे. महत्त्वाचा बाब म्हणजे या धमकी देणाऱ्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अज्ञात व्यक्ती अश्लील भाषेचा वापर करत असल्याचंही समोर आलं आहे. सोशल मीडियावरुन सुरु झालेलं हे प्रकरण आता कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय.

Published on: May 23, 2026 11:24 AM
Follow Us