आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
नीट पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर जंतर मंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीने सक्रिय भूमिका घेतली होती. या घडामोडींनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून त्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी संसदेकडे मोर्चा काढला होता. हा मोर्चा रोखण्यात आल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले. या पार्श्वभूमीवर संसद परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली होती. पक्षाने स्पष्ट केले होते की, “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल.”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माहिती मिळाल्यानंतर जंतर मंतर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अभिजीत दिपके म्हणाले, “तुम्ही जर नसता तर हा विजय झालाच नसता, सर्व श्रेय तुमचेच आहे.” आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृतीही बिघडली होती. ताप असूनही त्यांनी पुन्हा आंदोलनात सहभाग घेतल्याचे सांगितले जात आहे.
आता अभिजीत दीपकेचा एक फोटो समोर आला आहे यामध्ये त्याची प्रकृती खालावल्याचं दीसत आहे. त्याच्या हाताला सलाईन लावली असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत.