‘फरार’ परमबीर सिंग अखेर मुंबईत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) मुंबईत दाखल झाले आहेत. गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले होते.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) मुंबईत दाखल झाले आहेत. गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर आज सकाळी परमबीर सिंग यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये डीसीपी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सिंग यांची चौकशी करत आहेत. परमबीर यांच्यासह त्यांचे वकीलही आहेत. क्राईम ब्रांचच्या ऑफिसबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI