कोण आहेत संजय राऊत? ते फार मोठे नेते आहेत का? देवेंद्र फडणवीस यांचा खोचक सवाल
गुंडांवरून सरकारवर टीका झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पुण्यात पुणे पोलिसांनी जशी स्थानिक गुंडाची परेड काढली होती आणि कायदा सर्वांसाठी समान असेल तर भाजप कार्यकर्त्यांसाठी का नाही? असा सवाल विरोधकांनी केला
मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : गोळीबाराच्या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी अद्याप सुरूच आहे. पुण्यात निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जो हल्ला झाला. त्या हल्लेखोरांची परेड का निघाली नाही, म्हणून विरोधकांनी गृहविभागाला प्रश्न केलेत. गुंडांवरून सरकारवर टीका झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पुण्यात पुणे पोलिसांनी जशी स्थानिक गुंडाची परेड काढली होती आणि कायदा सर्वांसाठी समान असेल तर भाजप कार्यकर्त्यांसाठी का नाही? असा सवाल विरोधकांनी केला. एकीकडे पुण्यात निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणीही कायदा आणि सुव्यवस्था हाती न घेण्याचे आवाहन केलंय. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले की, अशी कामं कराल तर असीच दशा होईल असा इशाराच दिलाय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

