Prashant Koratkar : न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
Kolhapur Court : आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्याला पुन्हा पोलीस कोठडीत घेऊन जाताना कोर्टात वकिलांकडून शिवीगाळ करण्यात आली.
प्रशांत कोरटकर याची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोल्हापूर न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यावर कोरटकर याला आणखी २ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली आहे. यानंतर कोरटकर याला कोर्टातून पोलीस कोठडीत नेत असताना कोर्टातील वकिलांकडून कोरटकर याला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली आहे. यावेळी एकच गोंधळ उडाला. त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्या वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Published on: Mar 28, 2025 05:37 PM
Latest Videos
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

