ठाण्यात खवले मांजराच्या खवल्यांची विक्रीसाठी तस्करी, आरोपी ताब्यात

ठाण्यातील (Thane) वागळे ईस्टेट परिसरातील २२ नंबर सर्कल येथे एक  वन्यप्राणांच्या अवयवांची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट (Thane Police)एकच्या पथकास मिळाली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 28, 2022 | 11:49 AM

ठाण्यातील (Thane) वागळे ईस्टेट परिसरातील २२ नंबर सर्कल येथे एक  वन्यप्राणांच्या अवयवांची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट (Thane Police)एकच्या पथकास मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने 26 जानेवारी रोजी सायंकाळी सदर ठिकाणी सापळा लावून एका संशयितास ताब्यात घेतले. किरण परशुराम धनवडे असे अटक केलेल्या तस्कराचे ( smuggling) नाव आहे. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे असलेल्या एका बॅगेत दुर्मिळ सस्तन प्राणी खवले मांजराचे साडे पाच किलो खवले त्याच्याकडे आढळून आले. चौकशीत हे खवले 12 लाख रुपयात विकण्यासाठी आणले असल्याचे उघडकीस आले. हे खवले कोण खरेदी करणार होते व अटकेतल्या आरोपीने ते कोठून आणले होते याचा तपास सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें