अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन
गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज पहाटे 67 व्या वर्षी निधन झालं. यासंदर्भात अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून माहिती दिली. सतीश कौशिक यांची ओळख गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता, दिग्दर्शक निर्माते अशी होती. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत, मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असं म्हटलं आहे.
Published on: Mar 09, 2023 08:19 AM
Follow Us
Latest Videos
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
