राजकीय पोस्ट करत असल्यानं मला मालिकेतून बाहेर काढलं, Sharad Pawar यांच्या भेटीनंतर Kiran Mane LIVE

अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली.

अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली. त्यानंतर टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, साहेबांसमोर खरा माणूसच बसू शकतो, खोटा नाही…अशी सूचक प्रतिक्रियाही दिली. माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्यामुळे त्याची राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातही जोरदार चर्चा सुरू आहे.

अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांना व्यावसायिक कारणातून काढल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. मात्र, सोशल मीडयावर वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहे. लोकांनी माने यांना पाठिंबा दर्शवला असून भाजपवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे माने यांनी दोन ओळींची फेसबुक पोस्ट टाकत माघार घेणार नाही तर लढत राहीन असे सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा…गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा,” असे म्हणत मते व्यक्त करतच राहणार अशी भूमिका घेतली आहे.

Published On - 2:00 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI