Saif Ali Khan Discharge Video : ‘सैफ आता सेफ’! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज
गेल्या गुरूवारी सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यावेळी हल्लेखोराकडून सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले होते. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली होती तर मणक्यावरही चाकूचे वार करण्यात आले होते.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफ अली खानवर करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या उपचारानंतर अखेर आज सैफला डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या गुरूवारी सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यावेळी हल्लेखोराकडून सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले होते. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली होती तर मणक्यावरही चाकूचे वार करण्यात आले होते. यानंतर तातडीने अभिनेत्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 जानेवारीपासून अभिनेत्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज 6 दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आल्यानंतर आता सैफ अली खान हा त्याच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या फॉर्च्युन हाइट्समध्ये वास्तव्यासाठी जाणार आहे. त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, हल्लेखोराने वार केल्यानंतर जखमी झालेल्या रक्तबंबाळ सैफला तातडीने लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुमारे 4-5 तास झालेल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांने त्याच्या पाठीतून चाकूचा एक तुकडा बाहेर काढला होता. त्यावेळी सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

