Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Breaking Video : सैफच्या हल्लेखोराला अखेर बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?

Saif Ali Khan Breaking Video : सैफच्या हल्लेखोराला अखेर बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?

| Updated on: Jan 19, 2025 | 12:51 PM

काल मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येत आहे. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही कारवाई करण्यात आली.

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या कासारवडावली भागातून हल्लेखोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय दास असे अटक केलेल्या आरोपीचं नाव असून आरोपी पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आलियान यानेच सैफ अली खानवर हल्ला केला. आरोपीने सुरूवातीला आपलं नाव विजय दास असं सांगितलं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तर पकडलं जाण्याच्या भितीने आरोपीने नाव बदलून सांगितल असल्याचेही मुंबई पोलिसांकडून समजतेय. दरम्यान, आरोपीची चौकशी सध्या मुंबईतील खार पोलीस ठाण्यात सुरू आहे. यापूर्वी त्याची चौकशी चेंबूर पोलीस ठाण्यात झाली. सैफवर हल्ला करणारा ठाण्यातील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा. पोलिसांनी आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं. मुंबईतील पोलिसांची ३५ पथकं आरोपीच्या मागावर होती. अखेर आज त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. बघा पोलिसांनी कसा घेतला आरोपीचा शोध?

Published on: Jan 19, 2025 12:50 PM