बीड: आदिशक्ती मुक्ताईची पालखी (Adishakti Muktai Palakhi) बीडमध्ये दाखल झालीये. राजकीय नेते सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सकाळपासून भाविकांची मुक्ताईच्या दर्शनासाठी झुंबड आहे. वातावरण भक्तिमय झालंय, आसमंतात एकच गजर आहे. वारकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. तब्बल दोन वर्षानंतर सामान्य माणसाला वारीत सहभागी व्हायची संधी मिळतीये, आपली भक्ती दाखविण्याची संधी मिळतीये. वारकऱ्यांमध्ये (Warkari) प्रचंड उत्साह आहे. पाच जुलैला ही आदिशक्ती मुक्ताईची पालखी पंढरपूरात (Pandharpur) दाखल होईल. सध्या ही पालखी बीडमध्ये दाखल झालीये.