Breaking | आदित्यने माझा ताण पूर्णपणे कमी केलाय, मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंबईकरांना एक मोठे गिफ्ट दिले. ते म्हणजे मुंबईतील 500 चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत 16 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंबईकरांना एक मोठे गिफ्ट दिले. ते म्हणजे मुंबईतील 500 चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत 16 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांचा ताण कमी करणाऱ्या एका विशेष सहकाऱ्याचे पहिल्यांदा नाव जाहीर केले. त्यांचे तोंड भरून कौतुक केले. कोणाबद्दल बोलले मुख्यमंत्री, जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी सुद्धा रस्त्याची कामे मध्यरात्री जाऊन पाहिली. नालेसफाई नाल्यात उतरून पाहिली. दहीसर नदीचे काम असो की अजून काम. हा माझा पूर्ण ताण आता आदित्यने कमी केला आहे. तो रात्री, अपरात्री सर्वांसोबत नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्यासोबत बाहेर जातो. कामांची पाहणी करतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच जाहीर कौतुक केले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

