Aditya Thackeray News : एका मंत्र्याचा राजीनामा नको, संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Aditya Thackeray On Dhananjay Munde's Resignation : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारत राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका होत आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील सरकारवर यावरून निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राची परिस्थिती पाहता हे संपूर्ण सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी परिस्थिती आली आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या घटनेला 3 महीने झाले आहेत. तरीही काहीही झाले नाही. काल समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून मन सुन्न झालं आहे. डोळ्यात पाणी आलं होतं. सगळेच हादरून गेलेले आहेत. त्यांच्या परिवाराचे काय होत असेल याचा विचार देखील करवत नाही. काल मुख्यमंत्री एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्र्याकडे गेले. तिथे बैठक झाली. मुख्यमंत्री बोलवून नाही घेऊ शकत. राजीनामा मागवून घ्यायला हवा होता. भाजपची एक टॅगलाईन होती की महाराष्ट्र थांबणार नाही. हा महाराष्ट्र ज्यात गुन्हेगारी सुरू आहे तो आता थांबलाच पाहिजे. हे थांबवलाच गेलेच पाहिजे. फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन चालणार नाही. हे संपूर्ण सरकार बरखास्त झाले पाहिजे, असं आदित्य ठाकरेंनी म्हंटलं आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
