VIDEO : चांगला प्रकल्प होत असेल तर स्थानिकांना विश्वासात घेऊ – Aaditya Thackeray
कुठलाही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकं महत्त्वाची आहेत. लोकांची इच्छा आणि होकार असेल तर नक्की पुढे जाऊ. लोकांचा विश्वास जिंकूनच आपल्याला पुढे जायचं आहे. लोकांना डावलून पुढे जात नाही, असं सांगतानाच नानारमध्ये रिफायनरी होणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
कुठलाही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकं महत्त्वाची आहेत. लोकांची इच्छा आणि होकार असेल तर नक्की पुढे जाऊ. लोकांचा विश्वास जिंकूनच आपल्याला पुढे जायचं आहे. लोकांना डावलून पुढे जात नाही, असं सांगतानाच नानारमध्ये रिफायनरी होणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नाणार समर्थकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना नाणारमध्ये रिफायनरी होणार नसल्याचं सांगतानाच धोपेश्वरमध्ये लोकांशी चर्चा केली जाईल, असं स्पष्ट केलं. तर कुठेही प्रकल्प झाला तरी हरकत नाही. फक्त विकास झाला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भात रिफायनरी प्रकल्प नेण्याची भाजपकडून (bjp) मागणी होत आहे. त्याबाबतचा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच

