आता संपूर्ण जगानं आम्हाला मदत करावी, दिल्लीतील अफगाणी निर्वासितांची भावना

तालिबानं कब्जा केल्यानंतर आता आमच्या लोकांना इथं येण्यासाठी मोदी सरकारनं मदत केल्याबद्दल अनेक जण धन्यवाद मानताना दिसत आहेत.

दिल्लीच्या लाजपतनगर, जंगपुरा भोगल या भागात हजारोंच्या संख्येनं अफगाण निर्वासित स्थिरावलेत. दिवसेंदिवस इथ वाढणाऱ्या रिफ्युजींच्या रहिवासी संख्येमुळं इथल सगळं स्थानिक मार्केटही वाढत जातय. अफगाणी खाण -पानं त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तूंची दुकानं या सगळ्या गोष्टी इथं मिळतात. तालिबानं कब्जा केल्यानंतर आता आमच्या लोकांना इथं येण्यासाठी मोदी सरकारनं मदत केल्याबद्दल अनेक जण धन्यवाद मानताना दिसत आहेत.

इथ आलो नसतो तर मी मॅाडेल कधीच झालो नसतो. तालिबान्यांनी हे कधीच होऊ दिल नसत हे सांगताना त्याचा कातरस्वर लक्षात येतो. आता तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तिथ राहणाऱ्या 12-13 वर्षांच्या मुलींसोबत लग्न केली जातील आणि तिथल्या लोकांचा प्रचंड छळही केला जाईल, अशी भीती हाशाम खुर्शिदी व्यक्त करतो. आता संपूर्ण जगानं आम्हाला मदत करावी, असही आवाहन तो करतोय.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI