AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashraf Ghani | पैसे घेऊन पळालेलो नाही, मी अंगावरील कपड्यांसह देश सोडलाय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता

Ashraf Ghani | “पैसे घेऊन पळालेलो नाही, मी अंगावरील कपड्यांसह देश सोडलाय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता”

| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 8:05 AM
Share

काबुलमध्ये रक्तपात होऊ नये म्हणून मी देश सोडलाय. पैशांचं सोडा, मी अंगावरील कपड्यांसह देश सोडलाय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, असं मत अशरफ गनी यांनी व्यक्त केलं. (Afghanistan former president ashraf ghani press conference)

तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर कब्जा केल्यानंतर लगेचच देश सोडून पळून जाणाऱ्या राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी बुधवारी (18 ऑगस्ट) संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. देश सोडल्यानंतरचा नागरिकांशी हा त्यांचा पहिला संवाद आहे. यात त्यांनी पैसे घेऊन देश सोडल्याच्या आरोपांचं खंडन करत ते खोटं असल्याचं म्हटलं. पैशांनी भरलेल्या 4 कार आणि हेलिकॉप्टरसोबत देश सोडल्याची माहिती खरी नाही. हे सर्व विनाधार आहे. काबुलमध्ये रक्तपात होऊ नये म्हणून मी देश सोडलाय. पैशांचं सोडा, मी अंगावरील कपड्यांसह देश सोडलाय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, असं मत अशरफ गनी यांनी व्यक्त केलं. (Afghanistan former president ashraf ghani press conference)