Gopichand Padalkar यांच्या ‘त्या’ वक्तव्यानं वादं पेटला, विजय वडेट्टीवार यांनी दादांना काय दिलं आव्हान?
tv9 Special Report | गोपीचंद पडळकर यांच्या 'त्या' वक्तव्यानं वाद पेटला, अजित पवार यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना काय दिलं थेट आव्हान, बघा व्हिडीओ
मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | अजित पवार यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना आव्हान दिलंय. अशा लोकांना चिरडून आपण वाघ किंवा हत्ती आहात हे दाखवून द्या, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. तर दादांना सोबत घेऊनही भाजप अपमान करतेय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आणि त्यांनी आपला त्रागा व्यक्त केला. भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना लबाड लांडग्यांचं पिल्लू म्हणत जहरी टीका केली. त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पडळकरांच्या वक्तव्याचा दादांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. तर इकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दादांना आव्हान दिलंय. दादांनी यांना चिरडून दाखवावं तेव्हा ते वाघ किंवा हत्ती ठरतील, नाहीतर कोणीही असंच बोलेल असं वडेट्टीवार म्हणाले आणि त्यांना इशारा दिलाय.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

