MNS Rakhi | मुख्यमंत्र्यांच्या फोटोनंतर आता बाजारात मनसेच्या राख्या

MNS Rakhi | मुख्यमंत्र्यांच्या फोटोनंतर आता बाजारात मनसेच्या राख्या दाखल झाल्या आहेत. सण उत्सव

कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 07, 2022 | 5:18 PM

MNS Rakhi | मुख्यमंत्र्यांच्या फोटोनंतर (CM Photo) आता बाजारात मनसेच्या राख्या (MNS Rakhi) दाखल झाल्या आहेत. आगामी निवडणुका (Election) इनकॅश करण्यासाठी सण उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संपर्क वाढवण्याची ही आयडियाची कल्पना मनसे आणि शिंदे गटाने लढवली आहे. मुख्यमंत्री यांच्या फोटो असलेल्या आणि मनसेच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यासोबतच गडचिरोली भागातील आदिवासींनी तयार केलेल्या बाबूंच्या राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. राजमुद्रा आणि इंजिनाच्या राख्यांनी मनसेने राखी बाजारात प्रवेश केला आहे. तर कोरीव काम केलेल्या आखीव आणि रेखीव राख्यांनी ही बाजारपेठ सजली आहे. अनेक महिलांनी या राख्या खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली आहे. यंदा सण उत्सवाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पक्षांनी चालवल्याचे समोर आले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें