खारघर दुर्घटनेनंतर भारतीय हवामान विभागाच्या हालचाली सुरू, कोणता घेतला निर्णय?
VIDEO | खारघर दुर्घटनेनंतर भारतीय हवामान विभागाच्या हालचाली सुरू, प्रादेशिक हवामान केंद्राकडून पृथ्वी विज्ञान केंद्राकडे काय पाठवला प्रस्ताव?
मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्काराला उष्माघाताचं गालबोट लागलंय. नवी मुंबईतील खारघरच्या मैदानात या पुरस्कार सोहळ्यात हजर असलेल्या १३ श्रीसेवकांना उष्माघातानं आपला जीव गमवावा लागला आहे. या झालेल्या १३ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना मृत्यूचा आकडा सरकारकडून लपवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच उष्माघाताबरोबरच जमलेल्या लाखोंच्या गर्दीमुळे अनेक जण अत्यावस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, खारघर दुर्घटनेनंतर भारतीय हवामान विभागाकडून खारघरमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच खारघरमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यात येणार असून भारतीय हवामान खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. तर प्रादेशिक हवामान केंद्राकडून पृथ्वी विज्ञान केंद्राकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका

