Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manikrao Kokate Video : 'भिकारीही 1 रूपया घेत नाही पण सरकार 1 रूपयात...', कृषीमंत्री भिकारी नेमकं कोणाला म्हणाले?

Manikrao Kokate Video : ‘भिकारीही 1 रूपया घेत नाही पण सरकार 1 रूपयात…’, कृषीमंत्री भिकारी नेमकं कोणाला म्हणाले?

| Updated on: Feb 15, 2025 | 9:27 AM

पिक विमाचा उल्लेख करताना कोकाटे यांनी भिकारी शब्द वापरला. त्यावरून विरोधकांनी कोकाटेंचा समाचार घेतला. बघा नेमकं काय म्हणाले कोकाटे?

पिक विमाचा उल्लेख करताना कोकाटे यांनी भिकारी शब्द वापरला. त्यावरून विरोधकांनी कोकाटेंचा समाचार घेतला. आपले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे. अजित पवारांनी त्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी मंत्री केलं. पण कोकाटे शेतकऱ्यांबद्दल बोलताना भिकारीसारखे शब्द वापरतात. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि सरकार एका रुपयात पिक विमा देतं, असे उपकार करणारे शब्द मंत्री कोकाटेंनी वापरले. विषय पिक विमा घोटाळ्याचा होता. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना पिक विमा योजनेत पाच हजार कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा सुरेश धस यांचा आहे. पिक विमा योजनेत बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला अहवाल दिला. त्यानुसार शेतकऱ्यांना पिक विमासाठी एक रुपयाच्या ऐवजी १०० रुपये केले जाऊ शकतात. त्यावरून कोकाटेंनी एक रुपयाचा उल्लेख करताना भिकारी शब्द उच्चारला. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तर मंत्री माणिकराव कोकाटेंना संस्कारी म्हटलंय आणि त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला असं बावनकुळेंच म्हणणं आहे.

माणिकराव कोकाटे नाशिकच्या सिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार झालेत. त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्याच शेतकऱ्यांच्या जीवनावरी ते आमदार आणि मंत्री आहेत. स्वतः कोकाटे ही शेतकरी आहेत तरीही कोकाटेंना शेतकऱ्यांच्या पिक विमाचा विषय येताच भिकारी आठवला. पावसात, उन्हाताणाात राबणारा शेतकरी नेहमीसाठीच सॉफ्ट टार्गेटच राहिलेले आहेत. आतापर्यंत कोण कोण काय बोललय ते ही पाहुयात.

Published on: Feb 15, 2025 09:27 AM