Ahmedabad Plane Crash : किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्.. ; अहमदाबाद विमान दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ
Ahmedabad Plane Crash Video News : अहमदाबाद विमान अपघाताचा आणखी एक थरारक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
अहमदाबाद विमान अपघाताचा आणखी एक थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे. विमान कोसळल्यानंतर नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून थेट उड्या मारल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारं बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान 12 जून रोजी टेकऑफनंतर काही क्षणातच बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकलं होतं. या भीषण दुर्घटनेत या दुर्घटनेत 241 प्रवाशांसह जमिनीवर असलेल्या 38 जणांचा मृत्यू झाला, एकूण मृतांचा आकडा 279 वर पोहोचला आहे. दरम्यान, या दुर्घटनेचा आणखी एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, विमान हॉस्टेलवर कोसळल्यानंतर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी हॉस्टेलच्या बाल्कनीतून उड्या मारताना दिसत आहेत. कारण विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीमुळे आणि धुरामुळे परिस्थिती भीषण झाली होती. विमान हॉस्टेलच्या मेस क्षेत्रात कोसळले, जिथे दुपारच्या जेवणाची वेळ होती. यामुळे अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला.

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
