Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? थरारक व्हिडीओ आला समोर
Ahmedabad Plane Crash New Video : अहमदाबाद विमान दुर्घटनेत बचवलेल्या रमेश विश्वास कुमार यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
‘जाको राखे सैयाँ, मार सक ना कोई’ या म्हणीचे जिवंत उदाहरण बनलेले अहमदाबाद विमान दुर्घटनेतील रमेश विश्वास कुमार हे या दुर्घटनेत एकटेच बचावले. अपघात झाला आणि विमान कोसळलं त्यावेळी ते सीटसह बाहेर फेकले गेल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता रमेश यांचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात या अपघातातून बाहेर आल्यावर देखील ते कशाप्रकारे बचावले हे बघायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये घडणाऱ्या थराराच्या घटनेनंतर रमेश विश्वास कुमार याचं दैव बलवत्तर असल्याचंच म्हणावं लागणार आहे.
रमेश विश्वास कुमारचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते अपघातस्थळावरून बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अपघाताची भीषणता आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या किंकाळ्यांबद्दल सर्व काही स्पष्ट ऐकायला येत आहे. रमेश ज्वाला आणि धुराच्यामध्ये चालत बाहेर येत असतानाच त्याठिकाणी विमानात आणखी एक मोठा स्फोट झालेलं बघायला मिळत आहे. त्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली आहे. उपस्थित काही लोक रमेश यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, असं या व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे.