AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनगरांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी नवविवाहित जोडपं लग्नमंडपातून थेट उपोषणस्थळी, अन् म्हणाले...

धनगरांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी नवविवाहित जोडपं लग्नमंडपातून थेट उपोषणस्थळी, अन् म्हणाले…

| Updated on: Sep 17, 2023 | 4:53 PM
Share

VIDEO | गेल्या १२ दिवसांपासून अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजास आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने उपोषण, अशातच नवविवाहित जोडप्याने उपोषणकर्त्यांची घेतली भेट असल्याचे समोर आले आहे.

अहमदनगर, १७ सप्टेंबर २०२३ | अहमदनगरला चौंडी येथे गेल्या १२ दिवसापासून धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी चौंडी येथे उपोषण आंदोलन सुरू आहे. तर उपोषणाच्या बाराव्या दिवशी आंदोलकांची तब्येत खालवली असून उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. तर सुरेश शिवाजीराव बंडगर यांना कुपोषण स्थळावरच सलाईन लावून वैद्यकीय उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळावर नवविवाहित जोडप्याने भेट दिली असल्याचे समोर आले आहे. लग्न झाल्यावर लग्न मंडपातून थेट आंदोलन स्थळावर या नवविवाहित जोडप्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. तर आम्हाला धनगर समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं आल्याच्या भावना या नवविवाहित जोडप्याने व्यक्त केल्या आहेत.

Published on: Sep 17, 2023 04:52 PM