Asaduddin Owaisi : ओवैसी यांचं पाकिस्तानला चॅलेंज, थेट चीनचा उल्लेख करत पाक PM शाहबाज शरीफ अन् लष्करप्रमुखालाच डिवचलं
असुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर टीकास्त्र डागत चीनवरही निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर एअरबेसवर जात जवानांची भेट घेतली. आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त करण्यासह आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगवाही पाकिस्तानने केला होता. मात्र आज मोदींनी त्याच आदमपूर एअरबेसच्या धावपट्टीवर आपलं विमान उतरवून धावपट्टी सुरक्षित आहे हे दाखवलं आणि पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला. अशातच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला थेट आव्हान दिल्याचे पाहायला मिळत आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना थेट सवाल केला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी एक ट्वीट करत “पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे त्यांचे भाडेतत्त्वावरील चिनी विमान रहीम यार खान एअरबेसवर उतरवू शकतील का?” असा खोचक सवाल करत असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे.
Will S Sharief & A Munir be able to land their Leased Chinese Aircraft at
Rahim Yar khan Airbase ?— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 13, 2025
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

