संतोष बांगर यांच्या मातोश्रींसाठी धावून आले एकनाथ शिंदे!
शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला. हिंगोलीतील डॉक्टरांनी मुंबईत उपचारासाठी सल्ला दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नांदेडहून एअर अॅम्ब्युलन्स पाठवून त्यांना मुंबईत आणले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील आणि तत्पर स्वभावाचा प्रत्यय शिवसेना आमदार संतोष बांगर यांना नुकताच अनुभवायला मिळाला. आमदार बांगर यांच्या मातोश्री वत्सलाबाई बांगर यांच्या हृदयात ब्लॉकेजेसमुळे प्रकृती अचानक खालावली. हिंगोलीतील डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला. याबाबत बांगर यांनी त्वरित शिंदे यांच्याशी संपर्क साधला.
शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता नांदेड येथे विशेष एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. या एअर अॅम्ब्युलन्सद्वारे बांगर आणि त्यांच्या मातोश्री मुंबई विमानतळावर पोहोचले. शिंदे यांनी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांची भेट घेतली आणि मातोश्रींच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. तसेच, त्यांना तात्काळ मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले.
शिंदे यांच्या तत्परतेमुळे आणि एअर अॅम्ब्युलन्सच्या व्यवस्थेमुळे आपल्या आईचे प्राण वाचवणे शक्य झाल्याचे सांगत, आमदार बांगर यांनी शिंदे यांचे मनापासून आभार मानले. यावर शिंदे यांनी विनम्रपणे सांगितले की, प्रत्येक शिवसैनिक हा त्यांच्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहे आणि ही मदत कर्तव्यभावनेतून केली गेली.
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..

