Air India : एअर इंडियाच्या फ्लाईटला पक्षी धडकला अन्… आणखी एक विमान दुर्घटना थोडक्यात टळली, बघा काय घडलं?
शुक्रवारी दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकल्याची माहिती समोर आली. हा पक्षी धडकल्यामुळे विमानाला परतीचा प्रवास रद्द करावा लागला. या घटनेनंतर एअर इंडियाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. ते म्हणाले, विमान सुरक्षितपणे उतरले आणि पुण्यात उतरल्यानंतर पक्षी धडकल्याचे आढळून आले. विमान पुढील प्रवासासाठी थांबवण्यात आले.
एअर इंडियाच्या पुणे ते दिल्ली असा प्रवास करणाऱ्या विमानाला पक्षी धडकल्याचे समोर आले आहे. पक्षी धडकल्यानंतर विमानाचं व्यवस्थितरित्या लँडिंग करण्यात आलं. दरम्यान, इंजिनिअरिंग टीमकडून या विमानाच्या तपासणीसाठी एअर इंडियाचं पुणे ते दिल्ली AI 2470 हे विमान रद्द करण्यात आलं आहे. हे विमान रद्द करण्यात आल्यानंतर एअर इंडियाकडून पुणे ते दिल्ली AI 2470 या विमानातील प्रवाशांची पर्यायी प्रवासाची व्यवस्था कऱण्यात आली आहे.
एअरलाइनने म्हटले आहे की, ’20 जून रोजी पुण्याहून दिल्लीला जाणारे AI 2470 विमान पक्षी धडकल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. तर पुणे ते दिल्ली AI 2470 या विमानाला पक्षी धडकल्याचा प्रकार पुण्यात उतरल्यानंतर लक्षात आला.’ पुढे असेही म्हटले की, या घटनेनंतर अडकलेल्या प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था करण्यासह सर्व व्यवस्था एअर इंडिया करत आहे. तिकिटे रद्द केल्यास प्रवाशांना पैसे परत करण्याचा किंवा प्रवास पुन्हा करण्याचा पर्याय दिला जात आहे. यासोबतच, प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले

'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती

डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ

अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच
