Kalyan Local Train : काय म्हणावं यांना… झिंज्या उपटल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी अन्.. लोकलमधला VIDEO व्हायरल
लोकलच्या लेडीज डब्यात रोजच कोणत्या न कोणत्या कारणाने वाद होतच असतात. तसाच काहिसा वाद लोकलमध्ये पाहायला मिळाला आणि सुरू झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं. एकमेकींना शिवीगाळ, केस ओढत, बुक्के मारत महिलांनी एकमेकांवर मोठा हल्ला केला.
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनने दिवसाला लाखो प्रवासी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. लोकलसंबंधित नुकतीच मुंब्रा येथील घटना ताजी असताना आणखी एक लोकलची बातमी समोर आली आहे. लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Mumbai Local Train : लोकलच्या दारातच तुम्ही बॅग घेऊन लटकताय? तर हे वाचाच, कारण आता पीक अवर्सला…
कल्याणच्या लोकलमधील महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लोकलमधील महिलांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीची घटना मोबाईल कॅमेरात कैद करण्यात आली आहे. लोकलमध्ये महिला एकमेकांचे डोके फुटेपर्यंत आणि रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. लोकलने प्रवास करताना लेडीज डब्ब्यात कोणत्या न् कोणत्या क्षुल्लक कारणांवरून महिलांमध्ये वाद अन् हाणामारी होत असल्याचे कित्येकदा समोर आले आहे. अशातच हा व्हिडीओ पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
महिलांच्या हाणामारीची ही घटना नेमकी कोणत्या लोकल मधील आहे? ही घटना कधी घडली? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे पोलीस, लोहमार्ग जीआरपी पोलीस यांच्याकडून व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी राग व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी मारहाण करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.