मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 14, 2026 | 12:00 PM

फ्रँकफर्टहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI 2030 विमानाला जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. अहमदाबाद एटीसीला विमानाबाबत हायजॅक अलर्ट मिळाल्यानंतर सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या. वैमानिकाने स्क्वॉक 7500 सिग्नल दिल्यानंतर, जयपूरमध्ये सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातून दिल्लीकडे येत असलेल्या एअर इंडियाच्या AI 2030 या विमानाला जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाला हायजॅक करण्याचा अलर्ट मिळाल्यानंतर, तात्काळ ही कार्यवाही करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे हे विमान दिल्लीकडे येत असताना अहमदाबाद एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) ला विमानाबाबत हायजॅकचा महत्त्वाचा अलर्ट मिळाला. हा संदेश मिळताच, सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. वैमानिकाने स्क्वॉक 7500 (Squawk 7500) हा हायजॅक सिग्नल घोषित केला होता, जो विमानाचे अपहरण झाल्याची किंवा तसा प्रयत्न होण्याची शक्यता दर्शवतो. या अलर्टनंतर कोणतीही जोखीम न घेता, विमानाला दिल्लीच्या जवळ असताना जयपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जयपूर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन पण सुरक्षित पद्धतीने लँडिंग करण्यात आले. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण होते, परंतु कोणतीही अनुचित घटना न घडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सुरक्षा दलांनी विमानाची आणि प्रवाशांची कसून तपासणी केली. या घटनेमागील नेमके कारण काय होते, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Published on: Oct 14, 2026 12:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us