Air India Plane Crash : अहमदाबाद दुर्घटनेची एक नाही बरेच कारणं आली समोर? माजी पायलटनं सारंकाही सांगितलं…
विमानाचा अपघात कसा झाला? याच्या काही कारणांची शक्यता माजी पायलट मन्मथ कुमार यांनी आपल्या विश्लेषणात म्हटलं आहे. बघा नेमकं काय काय सांगितलं?
अहमदाबादहून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हे विमान अमेरिकन कंपनी बोईंगने बनवलेले ७८७-८ ड्रीमलायनर होते आणि एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क डेटाबेसनुसार, बोईंग-७८७ विमानाचा हा पहिलाच अपघात आहे. याआधी दोन इंजिन असलेल्या या मोठ्या बोईंग-७८७ ड्रीमलायनर विमानाच्या अपघाताची कोणतीही नोंद नाही. या विमानात बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये २५४ ते २६७ जागा आहेत. तर आतापर्यंत इतर बोईंग विमानांसह ६००० अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताची कारणं शोधली जात आहे. तर दुसरीकडे मृत्यू झालेल्याची ओळख पटवली जात आहे. अशातच लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा, हे अपघाताचं एक कारण असण्याची शक्यता आता समोर आली आहे. तर विमानात इंधन अधिक होतं त्यासोबतच प्रवाशांचंही लगेज जास्त होतं, असं कॅप्टन सुमीत सभरवालसोबत काम केलेल्या पायलटनं सांगितलं आहे. ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल होते.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

