Ahemdabad Plane Crash : दोन चिमुकल्यांसह 232 प्रवासी, 10 क्रू मेंबर; काय आहे विमान अपघाताची सध्याची स्थिती
Ahmedabad Plane Crash LIVE : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेनंतर आता या अपघाताचे काही व्हिडीओ समोर आलेले आहेत.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. टेकऑफ नंतर फक्त 10 मिनिटांनीच हे विमान कोसळलं आहे. मेघानी येथे ही दुर्घटना झाली. लंडनला जाणारं एअर इंडियाचं हे प्रवासी विमान होतं. यात 232 प्रवासी होते. त्यात 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे. तर 10 क्रू मेंबर देखील होते. या घटनेनंतर आता बचावकार्य सुरू करण्यात आलेलं आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.
दरम्यान, विमान दुर्घटनेच्या आधी विमानाच्या पायलटने एटीसीला धोक्याचा संदेश देखील पाठवला होता. कॅप्टन सुमित सबरवाल यांना 3 हजारांहून अधिक तास विमान चालवण्याचा अनुभव होता. त्यामुळे टेकऑफ नंतर त्यांच्याकडून चूक होण्याची शक्यता कमी असल्याचं एटीसीने म्हंटलं आहे. या संपूर्ण घटनेनंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ही घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर

