Special Report | बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचं ऐश्वर्य धोक्यात?

‘पनामा पेपर्स लीक’ (Panama Papers leak case) प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) हिची अंमलबजावनी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून तब्बल 6 तास चौकशी पार पडली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 20, 2021 | 11:37 PM

‘पनामा पेपर्स लीक’ (Panama Papers leak case) प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) हिची अंमलबजावनी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून तब्बल 6 तास चौकशी पार पडली. सोमवारी सकाळी सुरु झालेली ही चौकशी संध्याकाळी 7 च्या सुमारास संपली. यावेळी माध्यमांशी ऐश्वर्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीने माध्यमांशी बोलणं टाळलं. पनामा पेपर्स लीक प्रकरणात ऐश्वर्या राय-बच्चन ला यापूर्वी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, दोन तीन वेळ मागून घेतला होता. पुढे दुसरं समन्स बजावण्यात आल्यानंतर ऐश्वर्याला चौकशीसाठी हजर राहिली. यावेळी पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नावही समोर आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें