सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसे नेत्याची प्रतिक्रिया म्हणाला, ‘जनतेला आशेचा किरण राज ठाकरेच’
त्यावरून काँग्रेस, आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
दादर/मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 जणांच्या काल झालेल्या शपथविधीवरून राष्ट्रवादीसह अनेकांना धक्का बसला आहे. त्यावरून काँग्रेस, आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झालाय असे वक्तव्य केलं आहे. तर आता राज्यातील जनतेला फक्त राज ठाकरे हाच आशेचा किरण दिसतोय असं म्हटलं आहे. तर काही दिवसानंतर पक्षाचा मोळावा होणार असून त्यातून राज ठाकरे हे भूमिका मांडतील असेही ते म्हणालेत.
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर

