मनसे अन् मिटकरींमध्ये वार-पलटवार… शाब्दिक वाद काही मिटेना… घासलेट चोर vs खंडणीचोर
मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित दादांनी महाराष्ट्राला घासलेट चोर आमदार दिला आहे, असं टीकास्त्र योगेश चिले याने अमोल मिटकरी यांच्यावर डागलं आहे. दरम्यान, चिले यांच्या आरोपांवर अमोल मिटकरींनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
अमोल मिटकरी आणि मनसे वादात आता चोरी आणि खंडणीखोरीवरून आरोप सुरू झालेत. मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर घासलेट चोर आमदार अशी टीका केली. दरम्यान याटीकेनंतर अमोल मिटकरी यांनी योगेश चिले यांना खंडणीखोर म्हणत जोरदार पलटवार केला. मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यात वाद सुरू झाला तो म्हणजे पुण्यात राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या एका टीकेवरून… त्यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले त्यांनी थेट अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या कारवरच हल्ला केला आणि हे प्रकरण चांगलंच चिघळलं. यानंतर मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यातील शाब्दिक वार दिवसेंदिवस चांगलाच शिगेला पोहोचला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

