तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट…? अजित पवारांची अमोल कोल्हेंवर खोचक टीका

'...बाबा रे तुला लोकांनी पाच वर्षाकरीता निवडून दिले आहे. जरा कळ काढ., असे म्हणत अजित पवार यांनी कोल्हेंवर निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, अमोल कोल्हेंनी किती संपर्क ठेवला, किती लोकांना उपलब्ध राहिले. हे जनतेला माहिती आहे.

तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट...? अजित पवारांची अमोल कोल्हेंवर खोचक टीका
| Updated on: Apr 14, 2024 | 3:18 PM

तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे? असा सवाल करत महायुतीच्या मेळाव्यातून अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘गेल्या पाच वर्षापूर्वी ज्यांना तुम्ही निवडून दिले. त्यावेळी त्यांच्या सभांना अनेक ठिकाणी आलो आहे. परंतु पाच वर्षाच्या मध्येच कोल्हे मला म्हणाले. दादा मला राजीनामा द्यायचा आहे. माझं काम खासदाराच नाही. मी सेलिब्रेटी आहे, सिनेमात काम करणारा नट आहे. त्यामुळे माझं मोठं नुकसान होत असल्याने मला राजीनामा द्यायचा आहे. मी त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतल्यावर म्हटले की, बाबा रे तुला लोकांनी पाच वर्षाकरीता निवडून दिले आहे. जरा कळ काढ.’, असे म्हणत अजित पवार यांनी कोल्हेंवर निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, अमोल कोल्हेंनी किती संपर्क ठेवला, किती लोकांना उपलब्ध राहिले. हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे आता तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट… अशा शब्दांत दादांनी कोल्हेंना खोचक टोला लगावला. शिरूर लोकसभेचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विझानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली हा मेळावा पार पडला.

Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.