Pawar, Munde, Fadnavis Meeting : मुंडेंना घेऊन अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; तातडीच्या बैठकीत काय झाली चर्चा?
Ajit Pawar And Munde Meeting With CM : माजी मंत्री धनंजय मुंडे यांना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तातडीने भेट घेतलेली आहे. या भेटी मागचं कारण काय यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तासभर चर्चा झाली आहे. रात्री 10:30 ते 11:30 अशी तासभर चर्चा केल्यानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे हे वर्षा बंगल्यावरून निघाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे काळ रात्री 10:30 वाजता धनंजय मुंडे यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. छगन भुजबळ यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर लगोलगच ही बैठक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांच्या जोरदार टिकेनंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिपदी भुजबळांची वर्णी लागली आहे. त्यामुळे ही तातडीची भेट अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी का घेतली याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

