Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण, विशेष मकोका न्यायालयात सुनावणीला सुरुवात
Santosh Deshmukh Case Hearing : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज विशेष मकोका न्यायालयात पार पडत आहे. सुनावणीसाठी आज सरकारी वकील उज्वल निकम गैरहजर आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे. सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. कागदपत्र मिळालेले नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे. पेंड्राइव्ह देखील अद्याप मिळाला नसल्याचं आरोपीच्या वकिलांचं म्हणण आहे. दरम्यान, सरकारी वकील उज्वल निकम आज गैरहजर आहेत.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबरमध्ये निर्घृणपणे हत्या झालेली होती. खंडणीच्या वादातून अपहरण आणि अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आलेली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडसह 7 आरोपी सध्या अटकेत आहेत. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. या सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून केला जात असून सध्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका कोर्टात सुरू झालेली आहे. आज या सूनवणीची तारीख होती.