NCP : अजित दादांचा आमदार दादांचं ऐकेना! पक्षशिस्त न पाळल्यानं थेट पाठवली नोटीस अन्…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दिवाळीत केवळ हिंदूंनकडून खरेदी करण्याच्या त्यांच्या आवाहनामुळे अजित पवार नाराज झाले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दिवाळीच्या खरेदीवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जगताप यांनी भर सभेत “दिवाळीत फक्त हिंदूं कडूनच खरेदी करा” असे आवाहन केले होते, ज्यामुळे पक्षाची विचारधारा आणि धर्मनिरपेक्ष धोरणांचे उल्लंघन झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. या वक्तव्यामुळे अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या नाराजीनंतर जगताप यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जगताप यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली, तर रोहित पवार यांनी जगताप 2029 मध्ये भाजपमधून निवडणूक लढवतील असे म्हटले. दुसरीकडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र संग्राम जगताप यांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

