आपल्याच मुलीला नदीत फेकण्याची भाषा, धर्मरावबाबा आत्रामांचं टीकास्त्र अन् पवार गटाचा पलटवार
अजितदादांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार गटानं आत्रामांवर टीकास्त्र डागलंय. भाग्यश्री आत्राम हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नसल्याचं विधान धर्मरावबाबा आत्राम यांनी केलं होतं. बघा स्पेशल रिपोर्ट
अजित पवारांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्याच मुलीला नदीत फेकण्याची भाषा केलीय. आत्रामांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्याच मुलीवर टीका केलीय. दरम्यान त्यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाकडून पलटवार करण्यात आलाय. आत्राम यांनी केलेल्या वक्तव्यानतंर शरद पवार गटानं ट्विट करत धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह महायुतीवर शरसंधान साधलंय. स्वतःच्या लेकीला नदीत टाकणारे महाराष्ट्रातील लेकींची रक्षा करतील? तर मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यावर मतभेदाची भूमिका पत्करणाऱ्या आपल्या लेकीला आपण नदीत टाकणार अशी धमकी देणारे महायुतीचे गुंड जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींना न्याय आणि सुरक्षा कशी प्रदान करणार? महिलांच्या रक्षणाचे आणि सशक्तीकरणाचे आपणच नायक आहोत अशी खोटी दवंडी पिटणाऱ्या महायुती सरकारच्या महिलांप्रती असणाऱ्या निर्दयी आणि असंवेदनशील वृत्तीचा परिमाण म्हणजेच महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात आणि गुन्ह्यांत झालेली वाढ. दरम्यान जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची काय होणार? असं वक्तव्यही गडचिरोलीत धर्मरावबाबा आत्रामांनी केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्यावर पलटवार केलाय.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा

