Maharashtra Budget 2025 : ‘बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी बारा प्रियजणांना मान्य झालो..’, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजितदादांची तूफान डायलॉगबाजी
सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात डायलॉगबाजी करत शेरोशायरी देखील केली. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या डायलॉगबाजीवर टाळ्यांचा कडकडाट केलेला बघायला मिळाला.
महायुतीचं नवं सरकार आल्यानंतर आज राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला जात आहे. उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प अधिवेशनाच्या सभागृहात सादर करत आहेत. यावेळी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केल्यानंतर अजित पवार यांनी शेरोशायरी केलेली बघायला मिळाली.
बहिणी मिळाल्या धन्य झालो,
कोटी बारा प्रियजणांना मान्य झालो,
विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो,
पुन्हा आलो… पुन्हा आलो… त्यांच्या या शायरीने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झालेला बघायला मिळाला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ११वा अर्थसंकल्प मांडण्याची संधी हे माझे भाग्य. केंद्राने आयकरात सूट देत मध्यमवर्गीयांना दिलासा दिला, राज्यातील पायाभूत सुविधा व प्रकल्पांना भरीव तरतूद केली, त्याबाबत नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. असेच भक्कम पाठबळ देत राहा.
विकसित राष्ट्र संकल्प सिद्धिस नेण्यासाठी महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यासाठी सर्वसमावेशक रुपरेषा तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही.. अशी डायलॉगबाजी देखील यावेळी अजितदादांनी केली.

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
