‘माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी…’, दादांच्या आमदाराचं महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य, बघा काय म्हणाले?
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे आणि अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. महिलांसंदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देवेंद्र भुयार एका कार्यक्रमात बोलताना असे म्हणाले, ‘मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्यांना भेटत नाही, तर ती नोकरीवाल्या मुलाला भेटते. दोन नंबरची मुलगी कोणाला भेटते, पान टपरी वाल्याला, किराणा दुकानदाराला डोंबरी मुलगी दिली जाते. तर तीन नंबरचा गाळ हेबडली हाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते.’ पुढे ते असेही म्हणाले, शेतकऱ्याच्या मुलांचं काही खरं राहिलेलं नाही. जन्माला येणारं लेकरूसुद्धा हेबाळ निघतं. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वाणराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे सगळं..”, असं महिलांच्या दिसण्यावरून आमदार देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य एका कार्यक्रमात केल्याचे पाहायला मिळाले. मात्र आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.