Jammu-Kashmir : दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल; फुटेज आलं समोर
Terorrist Amir Nazir Wani Video Call : दहशतवादी आमिर नझिर वाणी याने मृत्यूच्या आधी आपल्या बहिणीला व्हिडीओ कॉल केला होता. या व्हिडीओ कॉलचं फुटेज आता समोर आलं आहे.
दहशतवादी आमिर नझिर वाणी याने मृत्यूच्या आधी आपल्या बहिणीला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी त्या कुटुंबाने दहशतवाद्याला आत्मसमर्पण करायला सांगितलं होतं. मात्र कुटुंबाचं न ऐकता त्याने सैन्याच्या जवानांवर गोळीबार केला.
त्रालमध्ये आज भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन राबवून 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे तिन्ही दहशतवादी जैशचे होते. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवून भारतीय सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. यात मागच्या 3 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. आज दहशतवादी आणि सैन्यात झालेल्या चकमकीत दहशतवादी आमिर नझिर वाणी हा देखील होता. या चकमकीपूर्वी आमिर याने आपल्या बहिणीला व्हिडीओ कॉल केला असल्याचं समजलं आहे. या व्हिडीओ कॉलचं फुटेज आता समोर आलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

