Pulwama News : दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा
Terrorists Killed in Pulwama Tral : पुलवामाच्या त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. याआधी देखील शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेलं होतं
पुलवामाच्या त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. भारतीय सुरक्षादलाकडून त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी देखील शोपियानमध्ये अशाच एका सर्च ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेलं होतं. ऑपरेशन केलर राबवून लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला होता.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाकडून जम्मू – काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. यात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. 2 दिवसांपूर्वी शोपियानमध्ये ऑपरेशन सिंदूरअंतर्गत ऑपरेशन केलर राबवून लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आज भारतीय सुरक्षा दलाकडून पुलवामाच्या त्राल परिसरात आणखी 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाल्याचं बघायला मिळालं.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

